(म्हणे) ‘बाबरी मशीद कुणी पाडली नाही, हे सांगतांना लाज वाटते !’ – काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम्

  • अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांपूर्वी श्रीराममंदिर कुणी पाडले आणि तेथे बाबरी मशीद कुणी बांधली, हे पी. चिदंबरम् का सांगत नाहीत ? त्यांना हे सांगण्याची लाज वाटते का ? – संपादक
  • वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर साडेतीन सहस्र शिखांची हत्याही कुणीच केली नाही, हे सांगतांना पी. चिदंबरम् यांना लाज वाटते का ? – संपादक
  • वर्ष १९४८ मध्ये गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात ब्राह्मणांच्या हत्या कुणीच केल्या नाहीत, हे सांगतांना पी. चिदंबरम् यांना लाज वाटते का ? – संपादक
  • श्रीराम काल्पनिक आहे आणि रामसेतू श्रीरामाने बांधलेला नाही, असे म्हणार्‍या काँग्रेसची पी. चिदंबरम् यांना लाज का वाटत नाही ? – संपादक
  • सोयीनुसार लाज वाटून घेणारे पी. चिदंबरम हे ‘हिंदू’ आहेत, याचीच आता हिंदूंना लाज वाटत आहे ! – संपादक
माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम्

नवी देहली – हा देश नेहरू, गांधी, ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आहे. भारताच्या स्वातंत्र्याची ७४ वर्षे झाली, तरीही ‘बाबरी मशीद कुणी पाडली नाही’, हे सांगतांना मला लाज वाटते. हा निष्कर्ष आपल्याला कायम सतावत राहील, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केले. ते काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी बोलत होते.

चिदंबरम् पुढे म्हणाले की, ६ डिसेंबर १९९२ ला जे काही घडले, ते अत्यंत चुकीचे होते. या घटनेने आपल्या राज्यघटनेची अपकीर्ती झाली. सर्व आरोपी निर्दोष सुटले. त्यामुळे जेसिका लाल हिला कुणी मारले नाही, तसेच बाबरी मशीद कुणीही पाडली नाही. वेळ निघून गेल्यामुळे दोन्ही पक्षांनी ते (अयोध्या निकाल) मान्य केले. दोन्ही बाजूंनी ते मान्य केल्यामुळे तो योग्य निर्णय ठरला; पण दोन्ही पक्षांनी मान्य केलेला हा निर्णय योग्य नाही.’ देहली येथे एका बारमध्ये जेसिका लाल हिची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणी अद्याप कुणालाही दोषी ठरवून शिक्षा करण्यात आलेली नाही.