मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा माहिरा खान यांना गोतस्करीच्या प्रकरणी ७ वर्षांनी अटक !

  • या प्रकरणी ७ वर्षे कारवाई न करणार्‍या संबंधितांवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक
  • गोहत्येचे समर्थन करणारे काँग्रेसमधील धर्मांध नेते गोहत्या आणि गोतस्करीच करणार, यात आश्‍चर्य ते काय ? अशा काँग्रेसला हिंदूंनी निवडणुकीत धडा शिकवूनही जाग आलेली नाही, त्यामुळे तिला राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य ! – संपादक
  • गुन्हेगारीत धर्मांध महिलाही मागे नाहीत, हे सिद्ध करणारी घटना ! – संपादक
  • अशांना काँग्रेस शहराध्यक्षपद देते, हे लक्षात घ्या ! – संपादक
काँग्रेसच्या नेत्या माहिरा खान

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील काँग्रेसच्या नेत्या माहिरा खान उपाख्य महक वारसी यांना ७ वर्षांपूर्वीच्या गोहत्या, गोतस्करी आणि फसवणूक या गुन्ह्यांच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. माहिरा काँग्रेसच्या मुरादाबाद शहर महिला अध्यक्षा आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार असतांना माहिरा गोहत्या आणि पशू तस्करी करत होत्या. त्या वेळी राजकीय पाठिंब्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती, असे सांगितले जात आहे. माहिरा यांच्याविरुद्ध त्यांनी महाविद्यालयाला सरकारी अनुमती मिळवून देण्याच्या नावाखाली साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणीही गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी माहिरा यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करून खटला चालवण्यात येत होता.