मदरशांत जिहादी आतंकवादी आणि शस्त्रसाठा अनेकदा सापडला आहे, तरीही सर्वपक्षीय सरकारे मदरशांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देतात. हे आतातरी थांबेल का ? – संपादक
बांका (बिहार) – येथील सन्हौला-धोरैया मार्गावरील जामिया अरबिया तालीमुल कुरान या मदरशातून ४ देशी कट्टे आणि ८ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. हा मदरसा नोंदणीकृत नाही. या मदरशाचे संचालक महंमद फजरुद्दीन आहेत. त्यांचा आरोप आहे की, वाळू माफियांनी त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचले आहे.
Bihar Police recovers 4 pistols & 8 cartridges from Madrasa; Maulana claims ‘conspiracy’ https://t.co/46r7YRvfcr
— Republic (@republic) November 7, 2021
जून २०२१ या दिवशी बांका जिल्ह्यातील नवटोलिया क्षेत्रातील नुरी मशिदीच्या परिसरातील मदरशामध्ये बाँबस्फोट झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. हा मदरसाही नोंदणीकृत नव्हता.