|
अकोला – शहरातील मोडकेवाडी परिसरात ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी आरोपी मौलाना महंमद रिजवान अब्दुल शकूर (वय २६ वर्षे) याच्यावर पोलिसांनी ६ नोव्हेंबरच्या रात्री भारतीय दंडविधान संहिता कलम ३५४ अन्वये, तसेच ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा नोंद करून अटक केली. ही घटना ५ नोव्हेंबर या दिवशी घडली. मौलाना महंमद याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पीडित मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखलhttps://t.co/8dK8jDa9tq
— Mumbai Tak (@mumbaitak) November 7, 2021
आरोपीने रस्त्याने जाणार्या बालिकेला थांबवून तिला जवळ घेतले. ‘तू कुठल्या मदरशात शिक्षण घेतेस ?’, असे विचारून त्याने तिच्या अंगाला स्पर्श केला, तसेच तिचा हात धरून बळजोरी करण्याचा प्रयत्न केला. बालिकेने आरडाओरडा केल्यानंतर तिचे आई-वडील आणि काका यांनी बालिकेला आरोपीच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात या मौलानाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. ‘महंमद रिजवान अब्दुल शकुर हा तथाकथित मौलाना आहे’, असे पोलिसांनी सांगितले. तो एका साप्ताहिकाचा पत्रकारही आहे.