बिहारमधील दोन जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने २४ जणांचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण कळणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – बिहारच्या गोपाळगंज आणि पश्‍चिमी चंपारण या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत विषारी दारूमुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या संख्येत वाढ होण्याचीही शक्यता आहे. चंपारणच्या बेतिया गावामध्ये ८ लोकांचा मृत्यू झाला, तर गोपाळगंजमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अनेक लोकांची यामुळे दृष्टी गेली आहे. ‘मृतांचा शवविच्छेदन अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या मृत्यूंमागील नेमके कारण समजणार नाही’, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.