पर्यावरणाविषयी आपण आताच जागृत झालो नाही, तर मानवाला पृथ्वीही अपुरी पडू लागेल ?

‘जर आपण आताच जागरूक होऊन नैसर्गिक जीवन आत्मसात केले नाही आणि पृथ्वीची भाषा समजून घेतली नाही, तर पर्यावरणात सुधारणा होतील का ? याविषयी मला चिंता वाटते. मनुष्याकडून दिवसेंदिवस वापरली जाणारी नैसर्गिक साधने आज कशा विषम परिस्थितीत आहेत, त्याविषयी पर्यावरणवादी काही सांगत आहेत. यात पुढील काही उदाहरणे आहेत.

१. जल : पृथ्वीवर ३ टक्क्यांपेक्षा अल्प प्रमाणात जल पिण्यायोग्य राहिले आहे. अंटार्टिका, आर्टिक यांमध्ये पाणी बर्फ आणि ग्लेशियर (बर्फाचे पर्वत) या रूपात आहे. आजही एक अब्जपेक्षा अधिक लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. वर्ष २०३० पर्यंत वैश्विक स्तरावर पाण्याची मागणी पूर्ण करण्याची मर्यादा ४० टक्क्यांनी अधिक होईल.

२. अन्न : १३० कोटी टन अन्न प्रतिवर्ष वाया जाते. जगभरात आवश्यकतेपेक्षा अधिक खाण्याच्या सवयीमुळे आरोग्य आणि पर्यावरण यांवर प्रभाव पडत आहे. जगातील एकूण ऊर्जेचा वापर खाद्य क्षेत्रातील सहभागाच्या ३० टक्के आहे. त्याच समवेत एकूण ‘ग्रीन हाऊस (हरितगृह वायू) गॅस’ उत्सर्जनातील सहभाग २२ टक्के आहे. ‘हरितगृह वायू’ हा एक वायू आहे, जो तेजस्वी ऊर्जा शोषून घेतो आणि उत्सर्जित करतो.

३. ऊर्जा : ज्यांच्यापर्यंत अद्याप वीज पोचलेलीच नाही, असे जगभरात १२ अब्जांपेक्षा अधिक लोक आहेत. वर्ष १९६० पासून वर्ष २०१० पर्यंतच्या काळात ऊर्जा निर्मिती कार्यात प्रगती झाल्यामुळे वैश्विक ऊर्जेची मागणी २५ टक्क्यांपेक्षा अल्प झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

४. खनिज : जगभरात खनिज पदार्थांचे उत्खनन ६० अब्ज टन प्रतिवर्ष होते. विकसित देशांमध्ये खपणारे खनिज वर्ष २०५० पर्यंत १४० अब्ज टन वार्षिक होऊ शकते.

५. भूमी : जगभरात ५० टक्के भूमीचा उपयोग कृषीसाठी होतो. लोकसंख्या घटण्ो-वाढणे यांमुळे यांचा वापर अल्पाधिक होऊ शकतो. भूमीच्या उपलब्धतेची कमतरता, अधिक उत्पादन देण्यात न्यूनता असणे, खाद्य मागणीची पूर्तता करण्यावर प्रभाव टाकतील. शहरात रहाणार्‍यांची संख्या वर्ष २०१० पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत होती. ती आजच्या स्थितीच्या अनुमानाच्या हिशोबाने वर्ष २०५० पर्यंत ७० टक्के होईल. त्यामुळे कृषीभूमी आणि सुपिक क्षेत्रफळ यांत घट होईल. वरील गोष्टींच्या व्यतिरिक्त आणखीही काही गोष्टी आहेत, ज्या जाणून घेणे अपरिहार्य आहे.

६. शिसे (लेड) : शिशामुळे प्रत्येक वर्षी एक लक्ष पक्ष्यांचा मृत्यू होतो. ही माहिती ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाच्या अभ्यासातून समोर आली आहे. बंदूक चालवल्यावर गोळीतून निघणारा धूर आणि औद्योगिक कचर्‍यामध्ये सर्वाधिक प्रमाणात शिसे असणार्‍या दूषित जलामुळे पक्षांची प्राणहानी होत आहे.

७. प्लास्टिक : अमेरिकी वैज्ञानिकांच्या शोधानुसार ६० टक्के समुद्री पक्षी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे प्लास्टिक खात आहेत. वर्ष १९६० मध्ये ५ टक्क्यांपेक्षा अल्प समुद्री पक्ष्यांच्या पोटात प्लास्टिक सापडले. वर्ष २०१५ मध्ये ६० टक्क्यांपर्यंत पोचले. जर अशीच स्थिती राहिली, तर अनुमान केल्यानुसार वर्ष २०५० पर्यंत ६६ टक्क्यांपर्यंत पक्षांच्या पोटामध्ये प्राणघातकी प्लास्टिक असेल.

८. सूर्यावरील अग्नीज्वाळा : सूर्यावर उठणार्‍या आणखी अधिक प्रमाणातील अग्नीज्वाळांचा एक नवीन धोका समोर आला आहे. हल्लीच केलेल्या संशोधनात म्हटले गेले आहे की, सूर्यावर एवढ्या शक्तीशाली ज्वाळा (सुपर फ्लेयर) सुद्धा निर्माण होऊ शकतात की, ज्यामुळे भूमीवर वीज आणि ‘टेलीकम्युनिकेशन’ (संचार) व्यवस्था यांना अत्यंत हानीकारक ठरू शकतील.

काही उपाययोजना

१. रेडिएशनविरोधी ‘चिप’ : ‘मोबाइल टॉवर’वरून निघणार्‍या ‘रेडिएशन’च्या (क्षकिरणांच्या) धोक्याविषयी आय.आय. टी. मुंबईचे प्राध्यापक आणि ‘नेसा’ आस्थापन यांनी एक अशी ‘चिप’ निर्माण केली आहे , जी ‘रेडिएशन’ अधिक झाल्यावर ते शोषून घेईल. केवळ आवश्यकतेनुसार लहरी प्रक्षेपित करील.

२. जलहीन शौचालय : सूर्याच्या ऊर्जेवर चालणारी जलहीन शौचालये भारतात वापरायला प्रारंभ करण्यात आली आहेत. ज्यांना सुरक्षित आणि दीर्घकालीन स्वच्छता व्यवस्था हवी आहे, अशा जगभरातील त्या अडीच अब्ज लोकांना हे शौचालय साहाय्यक सिद्ध होईल. या योजनेची प्रमुख चाचणी करणारे आणि कोलोरॅडो विश्वविद्यालयाचे प्रा. कार्ल लिंडेनने म्हटले आहे की, या शौचालयामध्ये मानवीय मलमूत्र विसर्जन घटक एवढ्या अधिक तापमानापर्यंत गरम करण्याची क्षमता आहे की, ते बॅक्टेरियापासून मुक्त होतील.

खरे पहाता वरील सूत्रांवर विचार मंथन अवश्य करावे; कारण की हे सर्व होऊ शकले, तरच पर्यावरणाचे संतुलन होऊ शकेल !’

– रश्मि अग्रवाल

संदर्भ : (साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ४ एप्रिल ते १० एप्रिल २०१८)