१. दीपावलीच्या काळात हिंदूंवर आघात होणे, हे आता नवीन राहिलेले नाही. वर्ष २००४ मध्ये ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना झालेली अटक हिंदू कसे विसरतील ? कोणताही सबळ पुरावा नसतांना त्यांना थेट अटक होण्याचा प्रकार हा हिंदु अस्मितेवर घातलेला घाला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी ‘शिकंजे में शंकराचार्य’ यांसारखे मथळे वापरून हिंदूंच्या धर्मगुरूंची जी अपकीर्ती केली होती, ती कधीही भरून न येणारी आहे.
२. हिंदूंचे सणही दहशतीखाली साजरे करावे लागतात. वर्ष २००५ मध्ये ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला राजधानी नवी देहलीमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांत ६२ जण ठार झाले होते. आजही दिवाळी किंवा गणेशोत्सव या कालावधीत घातपात घडवून आणण्यासाठी आतंकवादी टपलेले असतात.
(संदर्भ – दैनिक ‘सनातन प्रभात’, वर्ष २०१८)