देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे १० सहस्र ४२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या ८ मासांतील ही सर्वाधिक अल्प संख्या आहे. गेल्या २४ घंट्यांत १५ सहस्र २१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या १ लाख ५३ सहस्र ७७६ रुग्ण उपचाराधीन आहेत.