कोडगु (कर्नाटक) येथील एका शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

प्रातिनिधिक छायाचित्र

कोडगु (कर्नाटक) – येथील जवाहर नवोदय विद्यालय या निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. यांमध्ये १० मुली आणि २२ मुले यांचा समावेश आहे. एका आठवड्यापूर्वी या शाळेतील सर्व २७० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी ९ वी ते १२ वीच्या वर्गातील आहेत. एका कर्मचार्‍यालाही कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.