कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे अंत्यदर्शन घ्यायला जाण्याआधी आणि अंत्यदर्शन घेतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘१८.१०.२०२१ च्या रात्री ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे निधन झाले. १९.१०.२०२१ या दिवशी त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला जाण्यापूर्वी आणि अंत्यदर्शन घेतांना आलेल्या अनुभूती अन् मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

१. अंत्यदर्शन घ्यायला जाण्याआधी आलेली अनुभूती

१ अ. अंत्यदर्शनाला जाण्याविषयी बोलणे चालू असतांना दोघींना सुगंध येणे : ‘१९.१०.२०२१ या दिवशी अल्पाहार सेवा झाल्यावर मी खोलीत गेले. तेव्हा पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी मला म्हणाल्या, ‘‘अगं, तू केसरकरकाकूंचे अंत्यदर्शन घ्यायला गेली नाहीस का ? त्यांचे दर्शन घेऊन ये.’’ आमचे असे बोलणे चालू असतांना मला खोलीत सुगंध आला; पण ‘सुगंध कशाचा आहे ?’, हे मला समजत नव्हते. पू. (सौ.) परांजपेआजींनाही सुगंध आला.

सौ. अमृता देशपांडे

२. पार्थिवाचे दर्शन घेतांना आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे

२ अ. अनुभूती – पार्थिवाचे दर्शन घेतांना ‘हिना’ अत्तराचा सुगंध येणे : मी केसरकरकाकूंच्या पार्थिवाचे दर्शन घ्यायला गेल्यावर मला त्या ठिकाणी पुष्कळ सुगंध येत होता आणि ‘हा ‘हिना’ अत्तराचा सुगंध असावा’, असे मला वाटले. सुगंध इतका तीव्र होता की, ‘माझ्यासमोरच ते अत्तर ठेवले आहे आणि त्याचा सुगंध माझे नाक अन् तोंड यांत जात आहे. जणू मी तो सुगंध पित आहे’, असे मला जाणवत होते.

२ आ. जाणवलेली सूत्रे

२ आ १. कै. (सौ.) काकूंकडे पाहून ‘त्या शांत झोपल्या आहेत’, असे मला वाटले.

२ आ २. ‘प्रत्यक्ष भूवैकुंठात साक्षात् श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले रहातात, त्या ठिकाणी मृत्यू येणे’, ही मोठी ‘गुरुकृपा’ आहे !’, या विचारानेच माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.’

– सौ. अमृता देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक