|
अशी वरवरची आणि संतापजनक क्षमायाचना करणार्या ‘डाबर’ आस्थापनावर हिंदूंनी बहिष्कार टाकल्यासच म्हणजेच त्यांची आर्थिक गळचेपी केल्यासच ते अन् त्यांच्यासारखी हिंदुद्वेषी आस्थापने सुतासारखी सरळ होतील, हे लक्षात घ्या ! – संपादक |
नवी देहली – ‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’ (तोंडवळा उजळण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर) या उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे. यात एक तरुणी दुसर्या तरुणीच्या चेहर्यावर ‘ब्लीच’ लावत आहे. तसेच या दोघी या सणाचे महत्त्व आणि त्यामागील कारण यांवर चर्चा करतांना दाखवण्यात आले आहे. या विज्ञापनावर सामाजिक माध्यमांतून टीका होऊ लागल्यावर ‘डाबर’ने क्षमायाचना केली आहे.
Fem’s Karwachauth campaign has been withdrawn from all social media handles and we unconditionally apologise for unintentionally hurting people’s sentiments. pic.twitter.com/hDEfbvkm45
— Dabur India Ltd (@DaburIndia) October 25, 2021
‘डाबर’ने त्याच्या ट्विटर खात्यावर ट्वीट करत, ‘कुणाच्याही श्रद्धा, प्रथा आणि धार्मिक परंपरा दुखावण्याचा आमचा हेतू नाही. जर आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा समूह यांच्या भावना दुखावल्या असतील, तर ते अजाणतेपणे होते आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.’