ऋषि दधीचिसम आपली समर्पितता । यास्तव गुरुदेवांना तुम्ही आवडता ।।

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या काळात ‘सनातन संस्थे’चे विविध राज्यांतील सेवारत प्रसारसेवक संत आणि सद्गुरु रामनाथी आश्रमात येतात. जणू संतांचा मेळाच जमतो आणि सर्वत्र आनंद अन् चैतन्य यांचा वर्षाव होऊ लागतो. आश्रमात आल्यावरही त्यांची सेवा चालूच असते. त्यांना शारीरिक त्रासही पुष्कळ होत असतो; पण ते सेवा करत असतात. स्वतःला विसरून श्री गुरूंना अपेक्षित असे करण्याची त्यांची धडपड पाहिली आणि त्यांचे तोंडवळे डोळ्यांसमोर येऊन त्यांच्याविषयी मनात कृतज्ञताभाव दाटून आला अन् ‘दधीचि’ हा शब्द आठवला. मग एक एक शब्द सुचू लागला. संत आणि सद्गुरु यांना पाहिल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करतांना मला सुचलेले काव्यपुष्प पुढे दिले आहे.

सौ. स्वाती शिंदे

ऋषि दधीचिसम तुमची समर्पितता ।
यास्तव गुरुदेवांना तुम्ही आवडता ।। १ ।।

आम्हास तर गुरुदेवांचे रूपच भासता ।
तव माध्यमातून असे श्री गुरूंची अखंड कार्यरतता ।। २ ।।

तुम्हा पहाता आमची होई मंत्रमुग्धता ।
आम्हा दिधला सहवास श्री गुरूंनी आपला ।। ३ ।।

चरणी आपल्या अनंत कृतज्ञता ।
अनंत कृतज्ञता ।। ४ ।।

– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१९)