पंतप्रधान शेख हसिना यांना असे प्रश्न विचारावे लागतात, यावरूनच ‘त्या हिंदूंच्या रक्षणार्थ विशेष काहीच करणार नाहीत’, असेच भारताने लक्षात घ्यायला हवे आणि बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ स्वतःहून कृती केली पाहिजे; मात्र आतापर्यंतचा अनुभव पहाता भारत असे काही करण्याची शक्यताच नाही !

नवी देहली – ‘लज्जा’ ही कादंबरी मी बांगलादेशातील धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लिहिली होती. २८ वर्षांपूर्वी बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान खालिदा झिया यांनी त्यावर बंदी घातली. जर आताच्या पंतप्रधान शेख हसीना धार्मिक हिंसेच्या विरोधात आहेत, तर त्यांनी पुस्तकावरील बंदी का उठवली नाही, असा प्रश्न या कादंबरीच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून विचारला आहे. बांगलादेशात कुराणच्या कथित अवमानावरून धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर नसरीन यांनी हे ट्वीट केले आहे. ‘लज्जा’ या कादंबरीत धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचारांचे कथन आहे. त्यामुळे धर्मांधांनी दबाव टाकून त्यावर बांगलादेशात बंदी घालण्यास भाग पाडले, तसेच तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नसरीन यांना बांगलादेशातून पलायन करावे लागले. त्या गेल्या २८ वर्षांपासून आजही विस्थापित म्हणून भारत आणि अन्य देश येथे वास्तव्य करत असतात.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !