‘सध्याच्या काळात विज्ञानाने पुष्कळ प्रगती केली आहे’, असे सांगितले जाते. त्याचे एक उदाहरण म्हणून ‘विविध आजारांवर उपाय म्हणून ‘ॲलोपॅथी’ने विविध औषधांचा शोध लावला आहे’, असेही सांगितले जाते; परंतु विज्ञान ‘एखादी घटना घडण्याचे मूळ कारण शोधणे किंवा ‘ॲलोपॅथी’च्या दृष्टीकोनातून आजार होण्याचे मूळ कारण शोधणे आणि त्या मूळ कारणांवर उपाययोजना सांगणे’, करू शकत नाही. त्यामुळेच अनेकांना ‘एखाद्या आजारासाठी अनेक आधुनिक वैद्यांना दाखवून किंवा त्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या करूनही आजाराचे मूळ कळत नाही आणि तो बरा होत नाही’, असा अनुभव येतो. त्यातील काही जण संतांकडे गेल्यावर त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर बरे होतात. म्हणजेच अध्यात्मात एखादा रोग होण्यासाठी त्याचे मूळ कारण शोधले जाते, उदा. त्या व्यक्तीला असणारा पूर्वजांचा त्रास, अपमृत्यूयोग इत्यादी. त्यामुळे त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.९.२०२१)