पिंगुळी येथे आज प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज

कुडाळ – तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ११७ वा जयंती उत्सव बुधवार, २० ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त पहाटे ५ ते ६ या कालावधीत काकड आरती, सकाळी ७ वाजता प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या समाधीस्थानी अभिषेक, ८ ते १० सार्वजनिक अभिषेक, १० ते ११ प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या समाधीस्थानी अभिषेक, दुपारी १२ ते १ प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांची आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी २ ते ३ प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा जन्मोत्सव आणि ११७ सुवासिनींच्या हस्ते पाळणा झोका कार्यक्रम, दुपारी ३ ते ४.३० ‘परमपूज्य राऊळ महाराज महिला भजन मंडळा’चे भजन, दुपारी ४.३० ते सायंकाळी ५.३० शेटकरवाडी, पिंगुळी येथील महापुरुष भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ५.३० ते ६.३० निवती महिला भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ७ ते ७.३० सांजआरती, सायंकाळी ७.३० वाजता प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या पादुकांची पालखी आणि दिंडी मिरवणूक, रात्री ८ वाजता कुडाळ बाजारपेठ येथील सिद्धिविनायक भजन मंडळाचे भजन, रात्री ८ ते १० या कालावधीत महाप्रसाद, रात्री १० वाजता ‘परमपूज्य राऊळ महाराज भजन मंडळा’चे भजन, रात्री कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट पिंगुळी’च्या वतीने करण्यात आले आहे.