‘शायअवे डॉट कॉम’कडून ‘नवरात्री ब्रा’ची ऑनलाईन विक्री !

सामाजिक माध्यमांतून टीका

हिंदू आणि त्यांचे सर्वपक्षीय शासनकर्ते निष्क्रीय अन् धर्माभिमानशून्य असल्याने आस्थापनांकडून हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी अशी कृती करून त्यांचा अवमान करण्यात येत आहे, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन करून ते थांबवले, तरी यावर कायमचा चाप बसवण्यासाठी सरकारने कठोर कायदाच करणे आवश्यक ! – संपादक

नवी देहली – ‘शायअवे डॉट कॉम’ या संकेतस्थळाने नवरात्रीच्या काळात महिलांचे ‘नवरात्री ब्रा’ या अंतर्वस्त्राची ऑनलाईन विक्री चालू केली आहे. यावर सवलतही देण्यात येत आहे. दोन ‘ब्रा’ची खरेदी करणार्‍यांना एक ‘ब्रा’ विनामूल्य देण्यात येत आहे. यापूर्वी रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवरही या संकेतस्थळाने अशाच प्रकारची अंतर्वस्त्रांची विक्री केली होती. आता याविषयी सामाजिक माध्यमांतून प्रचंड टीका होत आहे. ‘अन्य धर्मियांच्या संदर्भात अशा प्रकारची अंतर्वस्त्रे विकण्यात का येत नाहीत ?’, असे प्रश्‍नही उपस्थित करण्यात येत आहेत.