प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
३ वर्षे रिक्त जागा न भरणार्या उत्तरदायींना तात्काळ निलंबित करा !
‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेमुळे राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने राजस्थान महिला आयोगातील रिक्त पदे २ मासांत भरण्याचा आदेश दिला आहे. ‘मागील ३ वर्षे रिक्त असलेली महिला आयोगाची पदे त्वरित भरली जावीत’, यासाठी श्री. खंडेलवाल यांनी ही जनहित याचिका प्रविष्ट केली होती.’
आता तोट्यात जाणारीच नव्हे, तर सर्व सरकारी खाती खासगी व्यावसायिकांकडे द्या ! म्हणजे ती नीट चालवली जातील !
‘सरकारी विमान वाहतूक आस्थापन ‘एअर इंडिया’ची मालकी आता टाटा समुहाकडे गेल्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि ‘स्पाईसजेट’ यांनी बोली लावली होती. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ सहस्र कोटी रुपयांची बोली लावली होती.’
‘महिषा दसर्या’ला प्रारंभ करणार्यांनी पुढे बलात्कार्यांचा उत्सव साजरा केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
‘मैसुरू (कर्नाटक) येथे ५.१०.२०२१ या दिवशी हिंदुद्वेष्ट्यांकडून महिषासुराची शोभायात्रा काढून ‘महिषा दसर्या’ला प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला बसपचे नेते आणि माजी महापौर आर्. पुरुषोत्तम उपस्थित होते. चामुंडी टेकडीवर असुरांचा राजा महिषासुर याच्या पुतळ्याजवळ ‘महिषा दसरा’ आयोजित करण्यात आला होता; परंतु जिल्हा प्रशासनाने अनुमती नाकारल्याने उत्सव समितीने कार्यक्रमाचे स्थळ आंबेडकर पार्कमध्ये हालवले.’