अशा भुरट्या चोर्या करणार्या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच या अधिकार्याने अशा प्रकारचे किती गुन्हे केले असतील, याचाही शोध घेतला पाहिजे ! – संपादक
थिरूवनंतपूरम् (केरळ) – पोलीस उपनिरीक्षक ज्योती सुधारक यांना रेल्वेच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका प्रवाशाचा भ्रमणभाष संच चोरल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले. अरुण जेरी हे प्रवासी १८ जून २०२१ या दिवशी अपघातात मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी घटनास्थळी त्यांचे नातेवाईक पोचले असता त्यांना जेरी यांचा भ्रमणभाष आणि काही वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याविषयी केरळचे पोलीस महासंचालक, तसेच सायबर सेल पोलीस यांच्याकडे तक्रार केली. सायबर सेलने केलेल्या अन्वेषणात या भ्रमणभाषचा वापर पोलीस उपनिरीक्षक ज्योती सुधाकर करत असल्याचे समोर आले.
A Kerala police sub-inspector was suspended for stealing a mobile phone from a young man who had died in a train accident.#Kerala #Crime https://t.co/dig02QCmn8
— IndiaToday (@IndiaToday) October 10, 2021