श्रीरामपूरच्या पोलीस अधिकार्‍यावर निलंबित पोलीस अधिकार्‍याकडून गोळी झाडून आक्रमण !

  • असे माथेफिरू पोलीस जनतेचे काय रक्षण करणार ? – संपादक 
  • पोलिसाची वर्तणूक पहाता त्याला केवळ निलंबित का केले ? बडतर्फ का केले नाही ? – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

राहुरी (नगर) – तालुक्यातील दिग्रस येथे निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षकाने जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य वैशाली नांदूर यांच्या मुलांना बंदुकीचा धाक दाखवून डांबून ठेवले होते. मुलांची सुटका करण्यासाठी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तेथे गेले असता त्यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बंदुकीतून गोळी सुटून ती उपअधीक्षक मिटके यांच्या डोक्याजवळून गेल्याने ते थोडक्यात बचावले. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीसप्रमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक घटनास्थळी आले. आरोपी पुणे येथील निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक आहे.