गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

‘संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
गुरु घाली ज्ञानांजन । गुरु दाखवी निजधन ।
गुरु सौभाग्य देऊन । साधुबोध नांदवी ।।
अर्थ : गुरु म्हणजे ज्ञानांजन असून तो साधकाला मोक्षनिधान दाखवतो. गुरु मुमुक्षूला आत्मज्ञानप्राप्तीचे सौभाग्य देऊन साधूंच्या ठिकाणी असलेला आत्मबोध त्याला प्राप्त करून देतो.

ज्याप्रमाणे डोळ्यांत अंजन (काजळ) घातल्याने दृष्टी स्वच्छ होते आणि सूक्ष्म गोष्टी दिसू लागतात, त्याचप्रमाणे श्री गुरु आपल्या शिष्याच्या डोळ्यांत ‘ज्ञानाचे अंजन’ घालतात. श्री गुरूंच्या कृपेमुळे साधकाच्या बुद्धीवरील जडत्वाचे / अहंकाराचे पडदे दूर होतात. सर्व इच्छा-आकांक्षांच्या पलीकडे असलेल्या त्या निर्गुण-निराकार परमेश्वराची ओळख करून देण्याचे सामर्थ्य केवळ गुरूंमध्येच आहे. एवढेच नाही, तर ते साधकांना त्यांच्या अंतःकरणात असलेल्या ‘आत्मधना’ची ओळख करून देतात. हे आत्मधन म्हणजेच अंतर्यामी असलेल्या ईश्वरी तत्त्वाची प्रचीती !
‘सौभाग्य’ म्हणजे केवळ सांसारिक सुख नव्हे, तर ‘साधनेसाठी अनुकूल काळ आणि स्थिती लाभणे’ हे खरे आध्यात्मिक सौभाग्य आहे. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचे हे सर्वोच्च सौभाग्य केवळ श्री गुरूंच्या संकल्पामुळेच लाभते. जेव्हा गुरु साधकावर प्रसन्न होतात, तेव्हा त्याच्या अंतःकरणात निरंतर सत्-चित्-आनंदात रहाण्याची स्थिती, म्हणजेच ‘साधुबोध’ नांदू लागतो. गुरूंनी दिलेला हा बोध साधकाला जीवन्मुक्त अवस्थेपर्यंत घेऊन जातो. साधकांना अध्यात्मातील ज्ञान देऊन सर्व इच्छा-आकांक्षांच्या पलीकडे घेऊन जाणार्या ज्ञानस्वरूप श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२५.७.२०२६)
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !
गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरु सगुण रूप, तर ‘गुरुपादुका’ हे गुरूंची आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य प्रसारित करणारे त्यांचे निर्गुण स्वरूप आहे !