सनातनचे वैज्ञानिक भाषेतील ‘अध्यात्म’ विषयाचे ग्रंथ टिकण्याचा कालखंड

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आपल्या ऋषीमुनींनी सहस्रो ग्रंथ लिहिले आहेत आणि ते त्रेतायुग अन् द्वापरयुग अशी गेली दोन युगे टिकले अन् अजूनही ते लोकांना ज्ञात आहेत. आम्ही लिहिणार असलेले वैज्ञानिक भाषेतील ‘अध्यात्म’ विषयाचे ग्रंथ किती काळ टिकतील ? (३.३.२०११) 

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा

श्री. राम होनप

१. ग्रंथ टिकण्यासाठी आवश्यक असलेले घटक आणि त्याचे प्रमाण

टीप १ – ‘ग्रंथ टिकणे आणि त्याचे कार्य’, हे ग्रंथ निर्माण करणार्‍याच्या संकल्पावर अवलंबून असते. श्रीकृष्णाने द्वापरयुगात गीता सांगितली, तरी कलियुगात गीतेचा अजूनही काही जणांना आध्यात्मिक प्रगतीसाठी लाभ होतो, तसेच त्यातून काही जिवांना जीवन जगण्याची दिशा मिळते; कारण गीतेद्वारे अनेकांचा उद्धार होण्याविषयी श्रीकृष्णाचा संकल्प कार्यरत आहे.

टीप २ – धर्मग्रंथ किंवा संतांनी लिहिलेला ग्रंथ यावर वाईट शक्तींची सूक्ष्मातून आक्रमणे होत असतात, तसेच त्यावर अधर्म पसरवणार्‍या नकारात्मक विचारांचे वेळोवेळी आक्रमणही होत असते. तेव्हा त्या ग्रंथातील चैतन्यच त्या ग्रंथाचे कार्य अबाधित राखते.

श्री. राम होनप

टीप ३ : ग्रंथातील विषय वाचून वाचकाला त्या लिखाणाविषयी काही अनुभव आणि अनुभूती येतात. त्यामुळे वाचकाचा त्या ग्रंथातील ज्ञानाविषयी विश्वास, भाव आणि श्रद्धा निर्माण होते. यातूनच त्या ग्रंथाचा प्रसार पुढे पुढे होत जातो. ही प्रक्रिया त्या ग्रंथातील सत्यतेच्या प्रमाणावर अवलंबून असते.

टीप ४ : ‘अध्यात्म’ हा विषय एकच असला, तरी त्याचे स्वरूप आणि मांडणी पालटत जाते. त्रेता आणि द्वापर या युगांतील ग्रंथांत केवळ ज्ञान पुरेसे होते. कलियुगात ग्रंथातील ज्ञान वैज्ञानिक भाषेत आणि उदाहरणांसह असणे आवश्यक आहे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे कलियुगातील ज्ञानावतार असणे 

वेद, पुराणे, उपनिषदे, तसेच अन्य धर्मग्रंथ यांतील ज्ञान सध्याच्या काळात साधनेच्या अभावी सर्वसामान्य व्यक्तींना समजणे कठीण आहे. हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अंतर्ज्ञानाने जाणले. त्यामुळे त्यांनी सनातनच्या ग्रंथांत विविध धर्मग्रंथांचे सार सुलभ आणि वैज्ञानिक भाषेत उदाहरणांसह मांडले आहे. अशा ग्रंथांमुळे सर्वसामान्य वाचकांना अध्यात्मातील विषय सहजतेने समजतो आणि ते साधना अन् धर्माचरण करण्यास उद्युक्त होतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ज्ञानावतार असल्याने त्यांना हे कार्य करणे शक्य आहे.

३. सनातनचे वैज्ञानिक भाषेतील ‘अध्यात्म’ विषयाचे ग्रंथ टिकण्याचा कालावधी

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी निर्मिलेला ‘गुरुकृपायोग’ हा ग्रंथ पुढे ५,००० वर्षे कार्यरत राहील. या ग्रंथाचा आधार घेतल्याने अनेकांना जीवन जगण्याची दिशा मिळेल, तसेच ते शीघ्र आध्यात्मिक उन्नती साध्य करतील. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचा संकल्प आणि ज्ञानातील चैतन्य’, यांमुळे ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचा प्रसार पुढे आपोआपच होत राहील. सनातनचे अन्य विषयांवरील ग्रंथ ३,००० वर्षे कार्यरत रहातील. त्यानंतरचा काळ पालटलेला असल्याने त्यानुसार ज्ञानाची भाषा आणि स्वरूपही पालटलेले असेल.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २३.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३०, कालावधी : १० सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.