नवी देहली – सरकारी विमान वाहतूक आस्थापन ‘एअर इंडिया’ची मालकी आता टाटा समुहाकडे गेल्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि ‘स्पाईसजेट’ यांनी बोली लावली होती. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ सहस्र कोटी रुपयांची बोली लावली होती. यापूर्वी ‘एअर इंडिया’ची मालकी टाटा समुहाकडे जाणार असल्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले होते. वर्ष १९५३ मध्ये भारत सरकारने टाटा आस्थापनाकडेच असलेले एअर इंडिया आस्थापन स्वतःच्या अधिकार क्षेत्रात घेतले होते.
Welcome back, Air India 🛬🏠 pic.twitter.com/euIREDIzkV
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 8, 2021