‘१४.१२.२०१८ या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमात श्री कामाख्यादेवीचा पूजाविधी आणि यज्ञ करण्यात आला. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, गोवा
अ. ‘१४.१२.२०१८ ला रात्री ८ वाजता श्री कामाख्यादेवीच्या यज्ञाच्या आरंभी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची पूजा केली. तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या बोटांभोवती पांढर्या रंगाचे वलय निर्माण झालेले दिसले.
आ. रात्री ९.३० वाजता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई देवीवर अभिषेक करत असतांना मला त्यांच्या दोन्ही हातांची बोटे आणि तळहात पिवळ्या रंगाचे दिसले.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई हाताची मुद्रा करून लाल रंगाच्या फुलांनी देवीला सुगंधी अत्तर लावत होत्या. त्या वेळी त्यांच्या बोटातील अंगठीत मला श्री कामाख्यादेवीचे दर्शन झाले, तसेच त्या वेळी मला त्यांचे हात मेंदी लावल्यासारखे दिसले.
ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई देवीला कुंकू लावत असतांना त्यांच्या हातांच्या मुद्रांमध्ये मला त्रिशुळाचे दर्शन झाले.
उ. पूजेच्या ठिकाणी शिवाची मूर्ती ठेवली होती. त्या मूर्तीला घातलेल्या पांढर्या वस्त्रामध्ये मला शेषनागाचे दर्शन झाले. तेव्हा ‘यज्ञासाठी भगवान शिवही उपस्थित आहे’, असे मला जाणवले.
ऊ. रात्री १०.३० वाजता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई देवीला कुंकूमार्चन करत होत्या. त्या वेळी ‘देवीला लाल फुलांचा हार घातला आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले आणि माझी भावजागृती झाली.’
२. सौ. शालन जयेश शेट्ये, रत्नागिरी
‘श्री कामाख्यादेवी यज्ञाच्या वेळी देवीच्या प्रतिमेकडे पहातांना मला पुढील अनुभूती आल्या.
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीला सुवासिक अत्तर लावत असतांना ‘देवीला पुष्कळ आनंद होत आहे’, असे मला जाणवले.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई देवीला अभिषेक करतांना देवीच्या मुखावर हास्य दिसत होते.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई देवीला कुंकूमार्चन करत असतांना ‘देवी डोळे बंद करून शांतपणे कुंकूमार्चन करून घेत असून ती ध्यानस्थ झाली आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘देवी कुंकूमार्चन स्वीकारत आहे’, असे मला जाणवले.
ई. पुरोहित मंत्रपठण करत असतांना ‘देवी मंत्रमुग्ध झाली आहे’, असे मला जाणवले.
उ. कुमारिका पूजनविधीच्या वेळी ‘देवी कुमारिकेच्या माध्यमातून पूजा आणि ओटी हास्यवदनाने स्वीकारत आहे’, असे दिसत होते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री कामाख्यादेवी यांच्या कृपाशीर्वादाने वरील अनुभूती येऊन मला देवीला अनुभवता आले’, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
|