रस्त्यांवरील अपघातातील घायाळ व्यक्तीला १ घंट्यात रुग्णालयात पोचवणार्‍यास केंद्र सरकार देणार ५ सहस्र रुपयांचे बक्षिस!

  • भारतियांमध्ये इतरांना संकटाच्या काळात साहाय्य न करण्याची मानसिकता निर्माण झाल्याने पैशांच्या लोभापायी तरी लोक घायाळ व्यक्तीला साहाय्य करतील, अशीच अपेक्षा सरकार करत असणार, हेच यातून लक्षात येते ! अशी स्थिती येणे भारतियांना लज्जास्पद ! – संपादक
  • अशी योजना राबवण्याऐवजी समाजाला धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात सद्गुणांचा विकास केल्यास समाजामध्ये इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती निर्माण होईल ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – केंद्रीय आणि रस्ते महामार्ग मंत्रालयाने एक योजना घोषित केली आहे. यानुसार रस्त्यांवरील अपघातात गंभीररित्या घायाळ झालेल्यांना एका घंट्याच्या आत रुग्णालयात पोचवणार्‍या व्यक्तीला ५ सहस्र रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना १५ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असणार आहे. ‘आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यांवरील अपघातग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा हेतू आहे’, असे या मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यात व्यक्तीला रोख पुरस्कारासमवेत एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्वांत प्रामाणिकपणे सहकार्य करणार्‍या १० जणांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.