‘एकदा एक साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना म्हणाला, ‘‘माझी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मला आपला आशीर्वाद हवा आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘जो स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतो, त्याला ईश्वराचा आशीर्वाद निश्चितच मिळतो.’’
या प्रसंगी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘आतापर्यंत मी अनेक संतांनी भक्तांना आशीर्वाद दिल्याचे पाहिले आहे किंवा असे प्रसंग ऐकले आहेत; परंतु ‘आशीर्वादाचा लाभ त्यांपैकी कुणाला होतो किंवा नाही ?’, हे आतापर्यंत कुणी सांगितल्याचे ऐकिवात नाही. हे गूढ परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उकलले आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१.२०२१)