भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव !

श्री. सचिन कौलकर

‘चीनमधून आयात केलेल्या वस्तू बर्‍याच काळापासून भारतात सिद्ध केल्या जात आहेत, तरीही भारतियांनी स्वदेशी वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंना प्राधान्य दिले. याचे कारण म्हणजे भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव’, असेच म्हणावे लागेल. अमेरिकेने जपानमधील बाजारपेठेत स्वस्तात इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न केला. यातून अमेरिकेला जपानची बाजारपेठ हस्तगत करायची होती; मात्र देशाप्रती स्वाभिमान असल्याने त्यांनी अमेरिकेच्या वस्तूंकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यावर यांनी एक प्रकारे बहिष्कारच घातला.

– श्री. सचिन कौलकर, मुंबई (२६.७.२०२१)