पुन्हा रझाकाराची राजवट येऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – चेतन गाडी, आंध्रप्रदेश अन् तेलंगाणा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्या असलेली हिंदूंची स्थिती आणि रझाकाळातील हिंदूंची स्थिती यांत विशेष भेद नाही. रझाकाराच्या राजवटीत हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मिळत नव्हती आणि आजही तीच स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यनगरच्या काही भागांमध्ये प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेशमूर्ती हटवण्यात आल्या. अशा प्रकारे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन चालू राहिले, तर येणार्‍या काळात पुन्हा रझाकाराची राजवट येईल का ? अशी शंका येते. ते होऊ द्यायचे नसेल, तर भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.