शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

आनंदराव अडसूळ

मुंबई – शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) समन्स पाठवला आहे. मुंबईतील सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी अडसूळ यांची यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली आहे.