केरळच्या कोझिकोड आकाशवाणी केंद्राचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील नाटकाचे प्रसारण करण्यास नकार !

कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिले कारण !

केरळमध्ये हिंदुद्वेषी माकप सरकार असल्याने असे घडण्यात आश्‍चर्य नाही ! आता कोरोनातून कर्मचारी बरे झाल्यावर तरी हे नाटक सादर करण्याचा आदेश आकाशवाणीच्या मुख्य केंद्राने द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

कोझिकोड (केरळ) – येथील आकाशवाणी केंद्राने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील नाटकाचे प्रसारण करण्यास नकार दिला. हे प्रसारण २४ सप्टेंबर या दिवशी होणार होते. याविषयी राजधानी थिरूवनंतपूरम् येथील मुख्य केंद्राला कळवण्यात आले आहे. यामागे ‘कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे’, असे कारण देण्यात आले. ‘अखिल भारतीय रेडियो’कडून सर्व राज्यांतील आकाशवाणी केंद्रांना ‘राष्ट्रीय नाट्य उत्सवा’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नाटक सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या नाटकाची मुख्य संहिता आकाशवाणीकडून सर्व राज्यांना देण्यात आली आहे. राज्यांनी या संहितेचे स्थानिक भाषेत भाषांतर करून हे नाटक प्रसारित करायचे आहे.