मन झाले गुणमय आढावा सत्संगाने ।

सौ. स्नेहा भोवर

मन होते भरलेले ‘बहिर्मुख’ वृत्तीने ।
‘अंतर्मुख’ झाले ते आढावा सत्संगाने (टीप १) ।। १ ।।

मन होते भरले ‘नकारात्मक’ विचाराने ।
‘सकारात्मक’ झाले ते भाववृद्धी सत्संगाने ।। २ ।।

मन भरले होते ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूने ।
मनमोकळे केले त्याला आढावा सत्संगाने ।। ३ ।।

मन भरले होते ‘भीती वाटणे’ या स्वभावदोषाने ।
दोषांशी लढण्यास शिकवले आढावा सत्संगाने ।। ४ ।।

मन भरले होते ‘अधिकारवाणी’ या स्वभावदोषाने ।
‘नम्रते’ने वागायला शिकवले आढावा सत्संगाने ।। ५ ।।

मन होते भरलेले ‘आत्मविश्वासाच्या अभावा’ने ।
‘आत्मविश्वास वाढवला’ अभ्यासवर्गाने (टीप २) ।। ६ ।।

भाववृद्धी सत्संगात भावजागृती होऊन मन झाले आनंदी ।
वाईट विचार नष्ट झाले देवाच्या कृपेने ।। ७ ।।

टीप १ – व्यष्टी साधनेचा आढावा

टीप २ – अभ्यासवर्गात मनाला द्यायच्या स्वयंसूचनांचा अभ्यास घेतला जातो.’

– सौ. स्नेहा भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०१९)