सहजता, मोकळेपणा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नाशिक येथील कै. (सौ.) मंजुषा शशिधर जोशी (वय ५५ वर्षे) !

१. वयात पुष्कळ अंतर असूनही साधिकेला  सौ. मंजुषा यांच्याशी जवळच्या मैत्रिणीप्रमाणे मनमोकळेपणाने बोलता येणे

सौ. अनुश्री साळुंके
कै. (सौ.) मंजुषा जोशी

‘मी आणि सौ. मंजूताई यांच्या वयात पुष्कळ अंतर होते, तरी त्या मला माझ्या जवळच्या मैत्रिणीप्रमाणेच होत्या. मी त्यांच्याशी सर्व विषयांवर मनमोकळेपणाने बोलायचे. त्यांच्या तळमळीमुळेच मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेस प्रारंभ केला. साधना करण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ शंका आणि प्रश्न होते. मंजूताई कोणत्याही वेळी, अगदी रात्रीसुद्धा माझ्या शंकांचे निरसन करायच्या. प्रत्येक वेळी मला काही साहाय्य लागले, तर मी हक्काने ताई किंवा त्यांचे यजमान यांना सांगायचे.

२. परिस्थिती स्वीकारणे

मी त्यांच्या समवेत नाशिक येथे प्रसाराची सेवा करायचे. कधी कधी मला आर्थिक अडचण असायची. तेव्हा त्या स्वतःचे पैसे खर्च करून मला सेवेसाठी घेऊन जायच्या. कधी त्यांनाही अडचण असेल, तर आम्ही पायी जायचो. त्यांची परिस्थितीविषयी कधीच तक्रार नसायची.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा

ताईंच्या यजमानांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. ताईंची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा होती. त्यामुळे यजमानांच्या काळजीपोटी त्यांनी स्वतःची सेवा कधी थांबवली नाही. त्या देवावर श्रद्धा ठेवून सर्व सेवा करत होत्या.

त्यांच्या माध्यमातून देवाने मला साधनेत आणले आणि फुलासारखे जपले. मला योग्य दिशा दिली. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. देवाने घडवलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण साधिकेला माझे मनापासून नमन !’

– सौ. अनुश्री साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के),

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२१)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.