iOS आणि Android या प्रणालींच्या भ्रमणभाषवर उपलब्ध !
मुंबई – ‘बालसंस्कार’ या ‘मोबाईल ॲप’चे श्री गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर, म्हणजेच १० सप्टेंबर २०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते एका ‘ऑनलाईन’ सत्संगात प्रकाशन करण्यात आले. लहानपणापासून मुलांच्या मनावर साधनेचे संस्कार झाल्यास खर्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास होतो. मुलांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती प्रेम निर्माण व्हावे, यासाठी त्यांच्या मनावर राष्ट्र अन् धर्म यांचे महत्त्व बिंबवणे आवश्यक असते. हे महत्त्व बिंबवण्यासाठी पाल्य आणि पालक यांच्यासाठी बहुमूल्य अशी माहिती बालसंस्कार या मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.
१. या ॲपमध्ये देवता, ऋषीमुनी, संत, राष्ट्रपुरुष, गुरु-शिष्य परंपरा यांच्या बोधप्रद गोष्टी, ‘अभ्यास कसा करावा ?’, ‘विविध गड किल्ल्यांचे महत्त्व’, ‘मुलांसाठी चांगल्या सवयी’, ‘व्यक्तीमत्त्व विकास’, ‘मुलांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा’, ‘आदर्श पालक कसे बनावे ?’, ‘मुलांवर संस्कार कसे करावेत ?’, ‘मुलांच्या समस्या आणि उपाय !’ यांविषयी विवेचन करण्यात आले आहे. हे ॲप मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. एकदा वाचलेला मजकूर नंतर ऑफलाईन (इंटरनेटच्या वापराखेरीज) वाचता येण्याची सुविधा यात आहे.
२. हे ॲप Google Play Store तसेच Apple Store वर निःशुल्क उपलब्ध आहे. वाचकांनी हे ॲप त्यांच्या भ्रमणभाषमध्ये डाऊनलोड करून यातील अमूल्य ज्ञानाचा लाभ करून घेता येईल. तसेच परिचित, नातेवाईक आदींनाही डाऊनलोड करण्यास अवश्य सांगता येईल.
खालील लिंक वर ‘बालसंस्कार ॲप’ उपलब्ध !
- Android साठी लिंक : Balsanskar.com/android
- iOS साठी लिंक : Balsanskar.com/ios