अनिल देशमुख यांचे स्वीय साहाय्यक संजीव पलांडे निलंबित

(डावीकडे) अनिल देशमुख, (उजवीकडे) संजीव पलांडे

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय साहाय्यक संजीव पलांडे यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे. पलांडे हे अपर जिल्हाधिकारी असून त्यांना २६ जून २०२१ ला अटक करण्यात आली आहे. पलांडे यांना ४८ घंट्यांपेक्षा अधिक वेळ पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.