उतारवयातही उत्साही आणि तळमळीने सेवा करणार्‍या ८४ वर्षे वयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाण !

श्रीमती विजया चव्हाण

१. शिस्तप्रिय

त्या या वयातही पहाटे उठून योगासने करतात आणि सूर्यनमस्कार घालतात. त्या अंघोळ झाल्यावर लगेचच कपडे धुतात. त्यांचे ‘कपडे धुवायचे राहिले आहेत’, असे आजपर्यंत कधी झालेले नाही.

२. स्वीकारण्याची वृत्ती

चव्हाणआत्या यांना जपमाळेविषयी एखादे सूत्र सांगितल्यास त्या लगेच ते स्वीकारतात. ‘जपमाळ ओवण्याची सेवा करतांना माझ्याकडून काही चूक झाल्यास मला सांगा’, असेही त्या सांगतात.

३. ‘चव्हाणआत्या ८४ व्या वर्षीही उत्साही आहेत.

४. सेवाभाव

अ. त्या सेवेसाठी वेळेत उपस्थित रहातात आणि ठरलेल्या वेळेत खोलीत जातात. एखाद्या वेळी तातडीची सेवा असेल, तर त्यांची थांबण्याची सिद्धता असते. त्या प्रत्येक सेवा वेळेत पूर्ण करतात.

आ. त्या जपमाळ बिनचूक ओवतात. त्या एकदा जपमाळ ओवायला बसल्या की, कधीच इकडे-तिकडे पहात नाहीत. त्या सेवेशी समरस होऊन जपमाळा सिद्ध करतात. सेवा चालू असतांना त्या एक शब्दही बोलत नाहीत.

इ. त्या जपमाळ ओवतांना एखाद्या वेळी महाप्रसादाची वेळ झाली आणि त्यांची जपमाळ पूर्ण करायची राहिली, तर त्या महाप्रसाद ग्रहण करून झाल्यानंतर लगेच ती जपमाळ पूर्ण करतात.’

– सौ. सुषमा कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद आश्रम, पनवेल. (२४.२.२०२०)