बुरहानपूर, मध्यप्रदेश येथील हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. कांचनलता रायकवार (वय ६६ वर्षे) यांची सौ. विमल कदवाने यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. पायाच्या दुखण्यामुळे चालू न शकणारी वाचक प्रतिदिन पाक्षिक ‘सनातन प्रभात’ वाचू लागल्यावर चालू शकणे
‘सौ. कांचनलता रायकवार या ब्रह्मपूर (बुरहानपूर), मध्यप्रदेश येथे रहातात. त्यांना प्रथम मी पाक्षिक द्यायला गेले, तेव्हा त्यांनी ‘मला हे पाक्षिक नको’, असे सांगितले आणि पाक्षिक घेतले नाही. मी २ ते ३ वेळा त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी पाक्षिक चालू केले. गेल्या ३ वर्षांपासून पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदार आहेत. प्रारंभी त्यांना पाक्षिक लिखाण समजत नव्हते; परंतु आता त्या पूर्ण पाक्षिक वाचतात. त्या प्रतिदिन पाक्षिक वाचू लागल्यावर त्यांच्यात मला पालट जाणवला. त्या आधी पायाच्या त्रासामुळे चालू शकत नव्हत्या; परंतु आता त्या चांगल्या चालतात.
२. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ३ वर्षांपासून नामजपाला प्रारंभ करणे, सतत प्रार्थना करणे आणि देवाची भक्ती करत असल्याने प्रसन्न अन् हसतमुख असणे
त्या २५ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ संप्रदायाची साधना करतात. त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप त्या ११ माळा करतात. तसेच ‘सनातन प्रभात’च्या वितरकांनी सांगितलेला कुलदेवता आणि श्रीकृष्ण यांचा नामजप त्या गेल्या ३ वर्षांपासून येता-जाता ११ माळा करतात. त्या गणपति स्तोत्र आणि कालभैरव अष्टक वाचतात. त्यांना देवाची भक्ती करायला पुष्कळ आवडते आणि वाचनाचीही पुष्कळ आवड आहे. त्या सतत प्रार्थनाही करत असतात. त्यामुळे त्या सतत प्रसन्न आणि हसतमुख असतात.
३. अध्यात्माचा प्रसार करणे
पूर्वी त्या वसतिगृहात नोकरी करायच्या. तिथे त्या पाक्षिक ‘सनातन प्रभात’ इतरांना वाचायला द्यायच्या. घरी कुणी ओळखीचे किंवा नातेवाईक आले, तर त्या त्यांना संस्थेविषयी माहिती सांगतात.
४. पाक्षिकातील विशेष लेखाची छायांकित प्रत मुलीला वाचायला देणे आणि मुलीने त्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यावर तिच्या पायाचे दुखणे अल्प होऊन तिला चालता येणे
पाक्षिकातील विशेष लेख, नामजपादी उपायांविषयीच्या चौकटी आणि परात्पर गुरुदेवांचे लेख यांच्या छायांकित प्रती काढून त्यांनी त्याची एक धारिका करून ठेवली आहे. त्या त्यांतील काही भाग सतत वाचतात. त्यांनी मुलीला वाचण्यासाठीही एक धारिका सिद्ध करून ठेवली आहे. त्यांच्या मुलीच्या पायालाही पुष्कळ जळजळ होत होती. त्यामुळे ती चालू शकत नव्हती. तिने पाक्षिकात दिल्याप्रमाणे काही मास मुद्रा आणि नामजप केला. त्यामुळे तिच्या पायाची जळजळ पूर्णतः अल्प होऊन ती आता चांगल्या प्रकारे चालू लागली आहे.
५. साधिकेने सिद्ध केलेली धारिका सात्त्विक असणे आणि तिच्याकडे पाहून मन आनंदी होणे
त्यांनी सिद्ध केलेली धारिका सात्त्विक वाटते. त्या धारिकेला एक वेगळाच सुगंध येतो आणि त्याकडे बघून मन आनंदी होते. त्या म्हणतात, ‘‘आपण सर्व पाक्षिक सांभाळू शकत नाही; पण त्यातील विशेष भाग काढून धारिकेत एकत्रित केला, तर तो जतन करून ठेवता येतो आणि सर्वांना त्याचा नेहमी लाभ होतो; म्हणून मी धारिका सिद्ध करून ठेवली आहे.’’
गुरुकृपेमुळे मी हे लिहू शकले, तरी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. विमल कदवाने, (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), ब्रह्मपूर (बुरहानपूर), मध्यप्रदेश (६.३.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |