सोलापूर शहरातील अनेक नागरिक गूढ आवाजाच्या भीतीने घराबाहेर पडले
सोलापूर – येथे ४ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी शहराच्या काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कर्नाटकातील बागलकोट परिसरात भूकंपाचे केंद्र आहे. शहरातील अनेक नागरिक गूढ आवाज आणि इमारतीला कंपन जाणवल्याने भीतीमुळे घराबाहेर पडले होते; मात्र भूकंपांच्या धक्क्याच्या वृत्ताला भूकंपमापक यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
कोल्हापूर – येथे ४ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी ३.९ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. कोल्हापूरपासून पश्चिमेला १९ किलोमीटर कळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाची खोली भूमीच्या आत ३८ किलोमीटर असल्याने भूकंपाची तीव्रता अधिक जाणवली नव्हती.