हिंदु जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन
कागल (जिल्हा कोल्हापूर), ४ सप्टेंबर (वार्ता.) – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना ३ सप्टेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे कागल उपशहरप्रमुख श्री. प्रभाकर थोरात, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर आणि श्री. प्रदीप महाडिक, भारतीय किसान संघाचे कागल तालुकाप्रमुख श्री. बाबय्या स्वामी, बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी आणि श्री. श्रेयस निकम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
अंबड – येथील नायब तहसीलदार डी.एन्. पोटे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जागरण मंचचे प्रांत संयोजक अंबादास आंबोरे आणि हिंदु जनजागृती समितीचे रवींद्र अंबिलवादे, अजय देशमुख, जगदीश बियाणी इत्यादी उपस्थित होते.