पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्या चैतन्यमय प्रवचनाचा साधकांवर झालेला सकारात्मक परिणाम

संतांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते. निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मार्च २०२१ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. कोंडमळा (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील ‘वारकरी संप्रदाया’चे ह.भ.प. शांताराम महाराज कानसे यांच्याकडून त्यांनी प्रवचन करण्याची प्रेरणा घेतली. वर्ष १९९५ पासून त्यांनी ‘ईश्वराची सेवा’ म्हणून रामायण, महाभारत, श्रीमद्भगवद्गीता आणि संतचरित्रे यांवर प्रवचने करून समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य केले. पू. बांद्रे महाराज यांनी ३१.१.२०२१ या दिवशी ‘संत’पद प्राप्त केले.

पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज

३०.३.२०२१ या दिवशी सनातनच्या आश्रमात पू. बांद्रे महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. ‘संतांचे (पू. बांद्रे महाराज यांचे) चैतन्यमय प्रवचन ऐकल्याने साधकांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

(पू. बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निवासस्थानी देहत्याग केला. हा लेख त्यांच्या देहत्यागापूर्वीचा असल्याने त्यांचा उल्लेख ‘पू. बांद्रे महाराज’ असा केला आहे. ४ सप्टेंबर २०२१ या दिवशी देहत्यागानंतरचा ११ वा दिवस आहे.)

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत संतांचे (पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचे) प्रवचन ऐकण्यापूर्वी आणि ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली ६१ टक्के पातळीची साधिका यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांचे प्रवचन ऐकल्याने साधिकांवर झालेले परिणाम पुढे दिले आहेत.

१ अ. पू. बांद्रे महाराज यांचे प्रवचन ऐकल्याने चाचणीतील तिन्ही साधिकांवर सकारात्मक परिणाम होणे : पू. बांद्रे महाराज यांचे प्रवचन ऐकल्याने चाचणीतील तिन्ही साधिकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप १ – ‘ऑरा स्कॅनर’ने ९० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

२. निष्कर्ष

पू. बांद्रे महाराज यांचे प्रवचन ऐकल्याने साधकांवर पुष्कळ प्रमाणात सकारात्मक परिणाम झाले.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. पू. बांद्रे महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे प्रवचन ऐकणार्‍या साधकांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! संत सतत ईश्वराच्या अनुसंधानात असतात. ‘सर्वकाही ईश्वरेच्छेने होते’, असा त्यांचा भाव असतो. संतांकडून होणार्‍या प्रत्येक कृतीतून समष्टीचे कल्याण होते. पू. बांद्रे महाराज यांना ईश्वराकडून सूक्ष्मातून ज्ञान मिळत असे. त्यांचे प्रवचन अत्यंत प्रासादिक असल्याने सर्वसामान्य लोकांनाही ते सहज समजत आणि आकलन होत असे. सनातनच्या आश्रमात पू. बांद्रे महाराज यांनी ‘गुरूंचे महत्त्व’ यावर १ घंटा प्रवचन केले. ते साधकांना पुष्कळ भावले आणि त्यांच्या संदर्भात अनुभूती आल्या. पू. बांद्रे महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे साधकांचे मन, बुद्धी आणि देह यांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण नाहीसे होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.

४. पू. बांद्रे महाराज यांचे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे परीक्षण करणार्‍या साधकाला आलेली अनुभूती

२८.३.२०२१ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. अनिल देसाई यांनी पू. बांद्रे महाराज यांचे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षण केले. पू. बांद्रे महाराज यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच आढळली नाही. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि तिची प्रभावळ २३१.९३ मीटर होती. पू. बांद्रे महाराज यांची चाचणी करणारे श्री. अनिल देसाई यांनी सांगितले, ‘पू. बांद्रे महाराज यांचा ‘ॐ’ चा जप सतत चालू आहे’, असे जाणवते आणि त्यांच्याकडे पाहून आनंद जाणवतो.’

थोडक्यात, ‘संतांच्या (पू. बांद्रे महाराज यांच्या) वाणीत चैतन्य असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम श्रोत्यांवर (चाचणीतील साधिकांवर) होऊन त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले’, हे या चाचणीतून स्पष्ट झाले.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.८.२०२१)

ई-मेल : [email protected]