निर्मळ अन् सात्त्विक बनून आनंदी फूल होऊ आता ।

‘कोरोना’च्या संसर्गामुळे दळणवळण बंदी चालू झाल्यापासून पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मनीषा पाठक प्रतिदिन साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. त्या सत्संगाप्रती माझ्याकडून पुढील कवितेद्वारे कृतज्ञता व्यक्त झाली.

सौ. मनीषा पाठक
सौ. नम्रता कोळसकर

‘गुरुलीला’ नाव त्या सत्संगाचे । होता आरंभ त्याचा ।
अंतर्बाह्य पालटून टाके । वाणी मनीषाताईची ।। १ ।।

कधी प्रेमाने, तर कधी स्पष्टतेने । त्या सांगती सूचनावली ।
करता आज्ञापालन गुण येई आपल्यात । असे तो राजा आपत्काळात ।। २ ।।

विचाराचे गाठोडे बांधून दिली आहुती कृष्णचरणी ।
स्वभावदोष अन् अहं यांची मोठी व्याप्ती ।
ती लिहून गळ्यात घालता प्रतिमेची पडे पहिली आहुती ।
मन आता लागे श्री गुरुचरणी ।। ३ ।।

कृतीतून वृत्ती दिसते । नकळत अघटित घडते ।
क्षमायाचना करू सर्वांची । नको सुटायला दुजा कुणी ।। ४ ।।

निर्मळ अन् सात्त्विक बनून आता । आनंदी फूल होऊ आता ।
गुरुचरणी जाण्या आतुरली तव कन्या ।। ५ ।।’

– सौ. नम्रता कोळस्कर, सातारा रस्ता, पुणे. (१७.५.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक