-
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘हिंदु आणि नाझी स्वस्तिक’ या विषयावरील संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !
-
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे आहेत सहलेखक !
श्री. शॉन क्लार्क यांनी सादर केलेल्या ‘हिंदु आणि नाझी स्वस्तिकामागील आध्यात्मिक भेद’ या शोधनिबंधाला ‘सर्वश्रेष्ठ शोधनिबंध’ हा पुरस्कार मिळाला आहे. |
देहली – प्रत्येक प्रतिकातून सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ही सूक्ष्म स्पंदने सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. बहुतांश धार्मिक नेते त्यांच्या धर्माच्या प्रतिकांमधून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्म स्पंदनांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भक्तांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ‘दी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इनोव्हेशन्स इन मल्टिडिसीप्लिनरी रिसर्च (iConference), नवी देहली’ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. श्री. शॉन क्लार्क यांनी या परिषदेमध्ये ‘हिंदु आणि नाझी स्वस्तिकामागील आध्यात्मिक भेद’ हा शोधनिबंध ‘ऑनलाईन’ सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे त्याचे सहलेखक आहेत.
या वेळी श्री. शॉन क्लार्क यांनी विविध प्रतिकांच्या, विशेषतः हिंदु आणि नाझी स्वस्तिकाच्या संदर्भात केलेल्या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या विविध प्रयोगांची माहिती विस्ताराने दिली. यात त्यांनी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनाची माहिती विशेषत्वाने दिली.
श्री. शॉन क्लार्क यांनी सांगितलेली माहिती
१. हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांचा तुलनात्मक अभ्यास
मूळ हिंदु स्वस्तिकात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, तर नाझी स्वस्तिकात पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली.
२. हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक दंडावर धारण केल्याचा परिणाम
या प्रयोगात सहभागी दोघांपैकी पहिल्या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याने प्रयोगापूर्वीही त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. दुसर्या व्यक्तीमधून चाचणीपूर्वी सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. दंडावर नाझी स्वस्तिक बांधल्यावर पहिल्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ दुपटीने वाढून ५.७३ मीटर झाली. दुसर्या व्यक्तीमध्ये ५ मीटर लांबीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ निर्माण झाली, तर त्याच्यामधील सकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली.
वरील चाचणीनंतर त्यांच्या दंडावरील नाझी स्वस्तिक काढल्यानंतर, दोन्ही व्यक्ती प्रयोगापूर्वीच्या मूळ स्थितीला येईपर्यंत थांबण्यात आले. मूळ स्थिती आल्यावर त्यांच्या दंडावर हिंदु स्वस्तिक बांधण्यात आले. त्यानंतर २० मिनिटांनी केलेल्या चाचणीत पहिल्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पूर्णतः नष्ट झालेली आढळली. एवढेच नाही, तर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, जिची प्रभावळ १ मीटर होती. दुसर्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मूळ ३.१४ पासून ६.२३ मीटर झाली, म्हणजे जवळ जवळ दुप्पट झाली. आपापल्या परीने वरील दोन्ही प्रतिके कशी शक्तीशाली आहेत, हे या प्रयोगातून दिसून आले. नाझी स्वस्तिकाचा ते धारण करणार्यावर प्रचंड नकारात्मक परिणाम होतो, तर प्राचीन भारतीय स्वस्तिकाचा पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेले हे ७८ वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्वविद्यालयाने १५ राष्ट्रीय आणि ६२ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ५ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला ‘सर्वाेत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. |