मैसुरू (कर्नाटक) येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश ! – मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होत नसल्याने अशा घटना थांबत नाहीत ! – संपादक

मैसुरू (कर्नाटक) – येथे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेवर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

२४ ऑगस्ट या दिवशी ही विद्यार्थिनी तिच्या मित्रासमवेत शहराबाहेरील चामुंडी टेकड्यांच्या परिसरात फिरायला गेली होती. तेथे त्यांना ६ जणांनी अडवून पैशांची मागणी केली. दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आरोपींनी पीडितेच्या मित्राला मारहाण केली, तसेच विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या प्रकरणी अलनहळ्ळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (कुठे रामराज्यात मध्यरात्रीही दागिने घालून महिला एकटीच बाहेर पडू शकत होती, तर कुठे आताच्या काळात दिवसाही मित्रासमवेत असतांनाही तरुणीवर सामूहिक बलात्कार होतो ! ही स्थिती आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद होय ! – संपादक)