८ वर्षांत सतत पालटणार्या हत्यार्यांची नावे आणि पुरो(अधो)गाम्यांकडून करण्यात आलेले नवनवीन दावे यांमुळे दाभोलकर, तसेच अन्य पुरोगाम्यांच्या हत्या यांचे अन्वेषण भरकटले आहे, हे उघड सत्य आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणे, ही एककलमी मोहीमच या माध्यमातून राबवली जात आहे. – संपादक
पुणे – दाभोलकर यांच्या हत्येनंतर पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या. या सर्व हत्यांचा आणि नंतर नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत. या पाचही प्रकरणांतील आरोपी आणि साक्षीदार समान आहेत. दाभोलकर यांच्या हत्येला ८ वर्षे पूर्ण होऊनही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पकडले गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना पकडून त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.