नवी मुंबई – कोरोनाच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले काम उल्लेखनीय आहे. विशेषत्वाने कोरोनामुळे अनाथ झालेली मुले, तसेच महिला यांना आधार देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन स्वयंस्फूर्तीने योजना राबवल्या, हे अत्यंत संवेदनशील वृत्तीने काम केले आहे. नवी मुंबईप्रमाणे इतर शहरांनीही याचे अनुकरण करावे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी एका बैठकीत व्यक्त केले.