(म्हणे) ‘काश्मीर वेगळा देश असून भारत आणि पाक यांनी त्यावर नियंत्रण मिळवले !’

पंजाबमधील काँग्रेसचे राज्य अध्यक्ष नवजोतसिंह सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंह माली यांचे राष्ट्रघातकी विधान !

  • खलिस्तानची भाषा बोलणार्‍या माली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! अशा राष्ट्रघातक्यांच्या विरोधात कठोर कारवाई होत नसल्याने अन्यांनाही मोकळीक मिळत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावे !
  • काश्मीरचे महाराजा हरि सिंह यांनी काश्मीरचा भारतात अधिकृतरित्या विलय केला होता. त्यानंतर पाकने आक्रमण करून त्याचा मोठा भूभाग कह्यात घेतला. हा इतिहास जगजाहीर असतांना अशा प्रकारची विधाने जाणीवपूर्वक केली जात आहेत. अशांना सरकारने धडा शिकवला पाहिजे !
डावीकडून नवजोतसिंह सिद्धू आणि मलविंदरसिंह माली

चंडीगड – काश्मीर वेगळा देश होता. त्याच्यावर भारत आणि पाकिस्तान यांनी नियंत्रण मिळवले. काश्मीर हा काश्मिरी लोकांचा आहे, असे राष्ट्रघातकी विचार पंजाबमधील काँग्रेसचे राज्य अध्यक्ष नवजोतसिंह सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंह माली यांनी फेसबूकवर पोस्ट करून प्रसारित केले आहेत. या विधानाविषयी नवजोतसिंह सिद्धू यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दुसरीकडे अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांनी माली यांच्या विधानाला विरोध केला आहे. मजिठिया यांनी म्हटले की, या विधानाविषयी राहुल गांधी यांनी समोर येऊन त्यांचे मत मांडले पाहिजे. जर त्यांनाही माली यांच्याप्रमाणेच वाटत असेल, तर काँग्रेसचा खरा तोंडवळा समोर येईल. जर त्यांना असे वाटत नसेल, तर ते नवजोतसिंह सिद्धू यांच्यावर कोणती कारवाई करणार ? हे त्यांनी सांगितले पाहिजे.