|
पुणे – मी नेहमीच चित्रपटांमध्ये भारतीय सैन्याधिकार्यांना वाईट पद्धतीने दाखवल्याचे पाहिले आहे. या चित्रपटांतील सुंदर अभिनेत्रींचे कर्नल असलेले वडील नेहमीच वाईट असल्याचे दाखवले जाते. त्यांच्या एका हातात बंदूक आणि दुसर्या हातात व्हिस्कीची बाटली दाखवली जाते. मला नेहमीच हे त्रासदायक वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मी सन्मान करतो; मात्र मला वाटते की, अशा प्रकारचे एखाद्या समाजाला आणि व्यक्तीरेखेला दाखवण्यापासून टाळले पाहिजे, असे आवाहन भारतीय सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी येथे केले. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या दूरचित्रवाणी शाखेच्या सुवर्ण जयंतीचा येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सैन्यदलप्रमुख बोलत होते.