शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचा आरोप

देवगड – येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील आर्थिक घोटाळ्यात प्रथमदर्शनी सहभागी असणार्या; परंतु दीड वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचार्याला शिक्षण विभागाने चक्क चर्चेसाठी पत्र पाठवले आहे. यावरून शिक्षण विभागाच्या कारभाराची प्रचीती येते. ज्या विभागाला कर्मचार्याचा मृत्यू दीड वर्षापूर्वी झाला हे ठाऊक नाही, ते आर्थिक घोटाळ्याची चौकशी काय करणार ? असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले, ‘‘या घोटाळ्यात प्रथमदर्शनी सहभागी असलेल्या १६ कर्मचार्यांना ९ जुलैला गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात शिक्षणाधिकार्यांच्या उपस्थितीत चर्चेसाठी येण्याविषयी पत्र पाठवण्यात आले होते. दीड वर्षापूवी मृत्यू झालेल्या एका कर्मचार्याच्या घरीही हे पत्र पाठवण्यात आले. या घोटाळ्यात शिक्षकांना नाहक गोवण्यात आले असून त्यांचीही चौकशी चालू आहे. घोटाळा झाला त्या कालावधीतील तत्कालीन अधिकारी आणि लेखा परीक्षक यांचीही चौकशी झाली पाहिजे.’’
Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
परभणीत मंदिराचे छत कोसळले; ७ भाविकांचा मृत्यू !
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
FATF Vice Presidency : विवेक अग्रवाल यांची ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या उपाध्यक्षपदी निवड !