
तेल अविव (इस्रायल) – इस्रायली सैन्य पुढील अनेक वर्षांपर्यंत दक्षिण लेबनॉनमधील सुरक्षा क्षेत्रात तैनात राहील. अमेरिकेने किती दबाव आणला, तरी माघार घेणार नाही, अशी भूमिका इस्रायलने घेतली आहे.
इस्रायलचे अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रची यांनी सांगितले की,
१. आतंकवादी संघटना हिजबुल्ला शस्त्रे पूर्णपणे खाली ठेवून आत्मसमर्पण करत नाही, तोपर्यंत इस्रायल भूमिका पालटणार नाही.‘ इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधून माघार घ्यावी’, अशी कोणतीही औपचारिक मागणी अमेरिका करील, अशी अपेक्षा नाही. इस्त्रायल सुरक्षा क्षेत्रात केवळ तात्पुरत्या तपासणी नाक्यांऐवजी कायमस्वरूपी सैनिकी पायाभूत सुविधा आणि तळ विकसित करू शकतो.
२. सध्याची सीमाव्यवस्था इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करत नाही. देशाला संरक्षणात्मकदृष्ट्या सुरक्षित सीमांची आवश्यकता आहे. हिजबुल्ला माघार घेत नाही, तोपर्यंत आम्ही एक मिलीमीटरसुद्धा मागे हटणार नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, संरक्षणमंत्री आणि माझी हीच भूमिका आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये होणार चर्चा
इराण-अमेरिका कराराच्या अंमलबजावणीसाठी स्वित्झर्लंडमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा प्रारंभ होणार आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स स्वित्झर्लंडमध्ये पोचले आहेत. येत्या काही दिवसांत दोन्ही बाजू शस्त्रसंधी कराराच्या विविध पैलूंवर चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता