
मुंबई – बेस्ट कर्मचार्यांच्या संपाच्या कालावधीत काही आंदोलकांनी बसवर दगडफेक केली. या प्रकरणी धारावी, दहिसर, बांगूरनगर, दादर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
१. वडाळा आगारातील चालक ठकाभाऊ घुले म्हणाले, ‘‘सकाळी वडाळा ते विहार लेक या मार्गावर बस चालवत असतांना दोघांनी बसमध्ये गोंधळ घातला. संप असतांना गाडी का काढली ?, असा प्रश्न विचारून धमकी देत त्यांनी मला बस थांबवण्यास भाग पाडले.’’
२. ५ सहस्र ७०८ चालकांपैकी केवळ ५ जण कामावर होते, तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २ सहस्र ५१७ पैकी एकही कंत्राटी बस धावली नाही.
३. मालाड येथे ४ ते ५ मुखवटाधारी व्यक्तींनी बसवर चारही बाजूंनी दगडफेक केली. यात चालकासमोरील काचही फुटली. बसमध्ये प्रवासी असल्याने चालकाने बस न थांबवता पुढे नेली. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.
४. दहिसर येथे एका अज्ञात व्यक्तीने इलेक्ट्रिक बसवर केलेल्या दगडफेकीत बसची काच फुटली. दहिसर येथील आणखी एका घटनेत दगडफेकीमुळे बसच्या तीन काचा फुटल्या, तसेच ३० सहस्र रुपयांची हानी झाली.
‘सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये दिसणारी व्यक्ती मीच आहे’, अशी आरोपीची स्वीकृती !
पुणे विभागात धरणातील जलसाठ्यात लक्षणीय तूट !
‘महाराष्ट्र चेंबर’ निवडणुकीत एकता पॅनेलचा दणदणीत विजय
आजपासून महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशूसंवर्धन विभाग यांच्या वतीने राज्यभरात ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे आयोजन !
पत्नीला गोमांस खाण्यास भाग पाडणार्या धर्मांध पतीविरुद्ध गुन्हा नोंद !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक