आंतरराष्ट्रीय योगदिन

कोलकाता (बंगाल) – योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही आणि तो कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नाही. ती मानवी आत्म्याची अभिव्यक्ती आहे. योग आपल्याला संतुलित आयुष्य जगायला शिकवतो, तसेच काय करावे ? अन् काय करू नये ?, यांची जाणीव करून देतो, असे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी यांनी येथे केले. येथील ‘रेड रोड’वर आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जमलेल्या सहस्रो योगसाधकांना संबोधित करतांना पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले.
Yoga is the secret to staying young! 🧘♂️✨
As PM Modi shared in Kolkata, yoga helps make the body more flexible at age 40 than it was at age 20.
Truly a testament to the power of this ancient practice!
With events held at 2,500+ locations worldwide, the global celebration of… pic.twitter.com/MTi6tSQZZQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
वयाचा संदर्भ देत पंतप्रधान पुढे म्हणाले, आपले ध्येय असे असायला हवे की, आपले शरीर वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक असले पाहिजे, तर वयाच्या ६० व्या वर्षी ३० व्या वर्षापेक्षा अधिक ऊर्जावान राहिले पाहिजे. आपण योग केवळ ठराविक प्रसंगांपुरता मर्यादित ठेवू नये. त्यास आपल्या प्रतिदिनच्या आयुष्याचा भाग बनवला पाहिजे. याच उद्देशाने सरकारने यावर्षी ‘योग ३६५’ ही संकल्पना आणली असून त्याअंतर्गत १०० दिवसांचे ऑनलाईन योगवर्गही चालू करण्यात आले आहेत.
जगभरात २ सहस्र ५०० ठिकाणी कायक्रमांचे आयोजन !
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जगभरात प्रचंड उत्साह पहायला मिळाला. जगातील जवळपास अडीच सहस्रांहून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यांमध्ये २१० पेक्षा अधिक भारतीय दूतावास आणि केंद्र यांचा सहभाग आहे.
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी