१६ वर्षीय मुलीवर सातत्याने केले अत्याचार
कलबुर्गी (कर्नाटक) – विवाहाचे खोटे आश्वासन देऊन एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्या २० वर्षीय तरुणाला येथील विशेष ‘पॉक्सो’ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या वेळी त्याच्यावर ५५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. एका महिन्याच्या आत पीडितेला ५ लाख रुपयांची हानीभरपाईही देण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले. रझाक सब शेख असे बलात्कार्याचे नाव असून तो कलबुर्गी उपनगर पोलीस ठाण्याच्या सीमेतील ‘ए.पी.एम्.सी. यार्ड’ परिसरातील ‘हमाल संघ’ येथील रहिवासी आहे.
रझाकने लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. त्याने तिला कलबुर्गी शहरातील रामनगरच्या एका कारखान्यात नेले आणि तिथे तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले.

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले